राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत स्कूटीवर केला प्रवास !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | देशातील जयपूरमध्ये काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी सुरु असून आज राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करीत आहे. पायाभरणीनंतर दोन्ही नेते मानसरोवरच्या शिप्रा मार्गावरील हाउसिंग बोर्ड मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील. कार्यक्रमासाठी राहुल गांधी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास जयपूरला पोहोचले. दुपारी बाराच्या सुमारास ते महाराणी महाविद्यालयात पोहोचले, तिथे त्यांनी विद्यार्थिनींशी काही वेळ बोलून विद्यार्थिनींसोबत स्कूटीवरून प्रवासही केला.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी राहुल गांधी यांचे विमानतळावर स्वागत केले. राहुल गांधी आधी मानसरोवर येथील काँग्रेस मुख्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी करतील, त्यानंतर दुपारी सभा घेतील. यानंतर दुपारी 3.30 वाजता ते गांधी वाटिकेचे उद्घाटन करतील. या बैठकीला राहुल गांधी आणि खरगे येतील. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. अशा परिस्थितीत महिलांबाबतही घोषणा होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम