बिग बीने दिला मुलीला ५० कोटीच्या बंगला भेट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३

देशभरात नेहमीच बिग बी अमिताभ बच्चन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात आता पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपला जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला मुलगी श्वेता नंदा हिला भेट म्हणून दिला. अधिकृत कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे. ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची किंमत ५०.६३ कोटी रुपयापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बच्चन यांची शहरातील पहिली मालमत्ता आहे आणि बच्चन कुटुंबाच्या मालकीच्या तीन बंगल्यापैकी हा एक बंगला आहे.

मालमत्ता नोंदणी माहिती संकलित करणाऱ्या ‘जपके. कॉम’कडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, बच्चन यांनी ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीला बंगला हस्तांतरित केला आणि मुद्रांक शुल्क म्हणून ५०.६५ लाख रुपये भरले. विठ्ठल नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये स्थित, हा बंगला दोन भूखंडांनी बनलेला आहे. याची एकत्रित किंमत ५०.६३ कोटी रुपये आहे. यातील मोठा भूखंड अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्या नावावर आहे, तर लहान भूखंड एकट्या अमिताभ यांच्या मालकीचा आहे. यासंदर्भात बच्चन यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम