पहाटेच्या सुमारास मुंब्यात भीषण स्फोट

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ नोव्हेबर २०२३

मुंब्रा-कौसा येथील चांदनगर परिसर शनिवारी पहाटे झालेल्या मोठ्या स्फोटाने हादरला. सुरुवातीला हा – सिलिंडरचा स्फोट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी मिळालेले चारही सिलिंडर सुस्थितीत असल्याने हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू – झाली आहे. मात्र, प्राथमिक तपासात – गॅस लीकेज झाल्याने हा स्फोट झाल्याची – शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे इमारतीमधील सदनिकांच्या काचा फुटल्या. त्यात तीन व्यक्ती जखमी झाल्या. त्यापैकी एक १० वर्षांचा मुलगा आहे. अशू सय्यद असे या मुलाचे नाव असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

यावेळी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, माजी – मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी नगरसेवक राजन किणे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. मुघल पार्क ए विंगमध्ये तळमजल्यावरील भंगाराच्या दुकानात हा स्फोट झाला. या तळमजला अधिक चार मजली इमारतीत २४ सदनिका आहेत व ४ दुकानांचे गाळे आहेत. स्फोटामुळे इमारतीला तडे गेल्याने ही इमारत धोकादायक झाल्याने सुरक्षेच्या कारणामुळे महापालिका प्रशासनाने ही इमारत सील करून तात्पुरती रिकामी करण्याचा निर्णय घेतला आहे. तळमजल्यावरील भंगाराच्या दुकानाशेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर, क्लिनिक व पॉवर लॉन्ड्री यांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) व कलिना येथून आलेल्या फॉरेन्सिक टीमने तपासणी केल्यावर ही घटना एलपीजी गॅसच्या लीकेजमुळे घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे, असे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम