ग्राहकांची मोठी निराशा : एसबीआयच्या ईएमआयमध्ये मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  प्रत्येक व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक बँकेकडून कर्ज घेवून आपले स्वप्न सत्यात उतरवीत असतो त्याच लाखो ग्राहकांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. स्टेट बँकेने MCLR दर वाढवले ​​आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कारण SBI च्या या निर्णयामुळे आता EMI महाग होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी MCLR दरात 0.05% वाढ केली. त्यामुळे कर्जावरील व्याज महाग झाले. विशेष बाब म्हणजे हे नवीन दर 15 जुलै 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू होतील.

विशेष म्हणजे सर्व बँकांना MCLR जाहीर करणे बंधनकारक आहे. सर्व बँका एक महिना, 3 महिने, 4 महिने आणि 2 वर्षांसाठी MCLR घोषित करतात. MCLR मध्ये वाढ म्हणजे गृहकर्ज तसेच वाहन कर्जावरील व्याजदर वाढेल. एसबीआयच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे, ग्राहकांसाठी ईएमआयवरील व्याजदर आणखी वाढतील. ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर लागू आहे आणि निश्चित व्याजदरावर नाही. तसेच, MCLR वाढल्यानंतर, EMI फक्त रीसेट तारखेलाच वाढेल. विशेष बाब म्हणजे 3 महिन्यांसाठी MCLR 5 bps ने वाढून 8.15 टक्के झाला आहे. तर 6 महिन्यांचा MCLR वाढून 8.45 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, 2 वर्षांचा MCLR देखील 5 bps ने वाढून 8.65 टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा MCLR 8.75 टक्के झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम