मोठी बातमी : डोंबिवली पुन्हा हादरली, अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २३ मे २०२४ | डोंबिवली MIDC स्फोट अपडेट्स: डोंबिवलीतील MIDC भागातील सोनारपाडा येथे असलेल्या एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर आणखी छोटे स्फोटांचे आवाजही ऐकू आले आहेत. स्फोटामुळे तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे. नेमक्या कोणत्या कंपनीत हा स्फोट झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळाचा आढावा:

डोंबिवली MIDC फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. पाच ते सहा कामगार जखमी झाले असल्याची भीती व्यक्त होते आहे. डोंबिवली अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

स्फोटानंतर राखेचा वर्षाव:

स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या इमारती आणि रस्त्यावरच्या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटामुळे हवेतून राख पडत आहे. अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर राख आणि लोखंडी कण हवेत उडाले आहेत. त्यामुळे MIDC परिसरात भीतीचे वातावरण आहे.

घटनास्थळी स्थिती:

अंबर केमिकल कंपनीच्या आसपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. काही पादचारी राखेत माखले आहेत. काही कुटुंबं लहान मुलांसह रस्त्यावर चालत असताना स्फोट झाल्याने मुलं घाबरली आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया:

जितेंद्र आव्हाड यांनी विचारले की, “MIDC ने या संदर्भात फायर ऑडिट केलं होतं का? महाराष्ट्र सरकारचं फायर ऑडिट विभाग कार्यरत नाही. दोन वर्षांपूर्वीही स्फोट झाला होता. MIDC ने किती कंपन्यांचं फायर ऑडिट केलं आहे याची श्वेतपत्रिका काढावी.”

प्रत्यक्षदर्शींची माहिती:

एक कामगार सांगतो की, स्फोट झाला ती कंपनी आमच्या शेजारी होती. सगळे बाहेर पळालो. आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने सांगितलं.

अग्निशमन दलाचे प्रयत्न:

मोठ्या स्फोटांमुळे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेक घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम