हनुमान मंदिराजवळील व सावरकर चौकातील नळाच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २२ मे २०२४ | प्रभाग क्रमांक दोन मधील हनुमान मंदिराजवळ तसेच सावरकर चौक येथे नळाच्या पाईपलाईनमध्ये लिकेज असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे परिसरातील अनेक भागांमध्ये २४ तास पाणी वाया जात होते. या समस्येच्या निराकरणासाठी माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी नागरिकांच्या तक्रारींनुसार पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

दारकुंडे यांनी सांगितले की, विविध भागांमध्ये पाण्याचे योग्य प्रकारे वितरण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोहार यांच्या घराजवळील चार पिण्याच्या पाण्याच्या वालांपैकी दोन व्हाल नादुरुस्त असल्याने पाणी वाया जात होते. या समस्येबाबत त्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या व पाठपुरावा केला होता. मात्र, आवश्यक कर्मचारी आणि साहित्य वेळेवर उपलब्ध नसल्याने काम लांबणीवर पडत होते.

आज रोजी संबंधित दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, आवश्यक कर्मचारी व साहित्य उपलब्ध करून घेतले आहे. नवनाथ दारकुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून या कामाची देखरेख केली.

हिंदू देवतांचे फोटो पायदळी? काँग्रेस कार्यकर्त्यांवर होत आहे टीका; पहा व्हायरल Video

दारकुंडे यांनी सांगितले की, “आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. हीच आमची कामाची पावती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.”

— नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेवक

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम