वारकऱ्यांसाठी मोठी बातमी ; केद्रीय मंत्र्यांच्या मागणीला यश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  यंदाच्या महिन्यात राज्यात सर्वात मोठी आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरला जात आहेत. काही लोक पायी जातात. तर काही लोक बसने, रेल्वेने जातात. तर आता वारीमुळे रेल्वे बस तुडूंब भरलेल्या असतात याच पार्श्वभुमीवर विदर्भातील वारकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विदर्भातून तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या रेल्वे गाड्या नागपूर, अमरावती व खामगाव या तीन ठिकाणांहून सुटणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून वारीसाठी विदर्भातून विशेष रेल्वे सोडव्या अशी मागणी केली होती. गडकरी यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. विदर्भातून आता वारीसाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे नागपूर, अमरावती आणि खामगावमधून सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणेज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात या रेल्वे गाड्यांना थांबा असल्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे एसटी बसला होणारी गर्दी देखील नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम