राज्यात जेवण महागले ; भाज्यांचे दर कडाडले !
बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक क्षेत्रात महागाईचा डोंगर वाढत असतांना आता राज्यात जेवण करणे देखील महागले आहे कारण काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्यावर दिसून आला आहे. पावसामुळे आवाक घटल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.
ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. तसेच होलसेल मार्केटमध्ये फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवस तरी ही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्ती केली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये २६८० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. तसेच पुणे सातारासह अनेक राज्याच्या विविध भागांतून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. अशातच पितृपंधरवडा सुरु झाल्यामुळे ग्राहकांकडून भाजीपाल्याची मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम