मोठी बातमी : परमबिर सिंह यांचं निलंबन मागे !
दै. बातमीदार । १२ मे २०२३ । राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबिर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे.
परमबीरसिंह हे पोलीस आयुक्त असताना त्यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं तसेच तुरुंगातही जावं लागलं होतं. 2021 मध्ये तत्कालीन ठाकरे सरकारने परमबीरसिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने परमबीरसिंह यांचं निलंबन मागे घेतलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम