मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून शरद पवार निवृत्ती घेण्याचे जाहीर !
दै. बातमीदार । २ मे २०२३ । राज्यात सुरु असलेल्या राजकीय कुरघोडीवर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देताना राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न केला.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे.
जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि… pic.twitter.com/YwVVgrrWiN— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलं की, “एक वेळ अशी आली…घाणेरडे आरोप…प्रत्यारोप…राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळं बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम