मोठी बातमी : जळगावात भर दिवसा हवेत गोळीबार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जुलै २०२३ ।  शहरातील शिवाजी नगराच्या मागील बाजूस असलेल्या एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे बराच वेळ परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती जळगाव शहर पोलिस स्थानकात जाताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसराच्या मागील बाजूस असलेले हुडको परिसरातील एका गल्लीत आज दि.१७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या वादातून वाद सुरु होता. त्यामुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. हा वाद इतक्या टोकाला गेली लोकांची गर्दी पगाविन्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याने जमलेले लोक तत्काळ घटनास्थळाहून निघून गेले याची माहिती जळगाव शहर पोलिसांना माहित पडतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरु होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे रतन गीते, प्रफुल्ल धांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम