अभिनेत्री राखीला दिला जवळच्या व्यक्तीने मोठा धोका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जुलै २०२३ ।  गेल्या काही महिन्यापासून सोशल मिडीयावर अभिनेत्री राखी सावंत मोठ्या चर्चेत येत आहे ‘ड्रामा क्वीन’ राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राखी सावंत नुकतीच दुबईहून भारतात परतली आहे. आता राखी दररोज सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधते.

दरम्यान, राखीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिची कार सोडून मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोमध्ये फिरताना दिसत आहे. एवढंच नाही तर तिने रिक्षात फिरण्याचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. एका जवळच्याच व्यक्तीनं राखीची फसवणूक केली आहे. यासाठी तिने पोलिसांकडेही धाव घेतली आहे. राखी सावंतच्या आयुष्यात अनेकदा काही ना काही उलथापालथ पाहायला मिळते. यावेळीही असेच काहीसे घडले. राखी सावंतने पापाराझीशी बोलताना, तिचा ड्रायव्हर तिच्या गाडीची चावी घेऊन पळून गेला आहे. यासोबतच तो तिचा सोन्याचा फोन आणि पैसे चोरून पळून गेला असल्याचं सांगितलं आहे. आता राखीची महागडी गाडी, सोन्याचा फोन आणि पैसे या गोष्टी चोरीला गेल्या आहेत हे उघड झालं आहे. या घटनेनंतर राखी खूपच अस्वस्थ झाली आहे. तिच्यावर नेहमीच कुठली ना कुठली संकटं येत असतात. ती म्हणाली की तो कुठेही जाऊन दे, कोणत्याही ग्रहावर जाऊन बसून देत.’ राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे,”माझ्या ड्रायव्हरने पैसे चोरी केले आहेत. फोन आणि बीएमडबल्यू कार घेऊन तो फरार झाला आहे. माझ्याकडे त्याचं आधार कार्ड सुद्धा नाही. गरीब म्हणून मी त्याच्यावर विश्नास ठेवला होता. पण आता मीच अडचणीत आले आहे”.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम