जनतेला मोठा दिलासा : गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ एप्रिल २०२३ ।  देशातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही बँकेत आपल्या खात्यात डिपॉझिट करीत असतो त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच रेपो रेटसंदर्भात घोषणा केली. त्यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ केली नाही. रेपो रेट 6.50 बेसिस पॉईंट कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबत त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांमध्ये सुमारे 35,000 कोटी रुपये आहेत, ज्यांचे कोणतेही दावेदार नाहीत. संसदेत दिलेल्या लेखी माहितीमध्ये असे म्हटलं की, फेब्रुवारी 2023 पर्यंत बँकांनी RBI कडे दावा न केलेल्या ठेवी म्हणून 35,012 कोटी रुपये जमा केले आहेत. मार्च 2022 पर्यंत ही रक्कम 48,262 कोटी रुपये होती. या अनक्लेमड केलेल्या डिपॉझिटबाबत शक्तिकांत दास यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. याशिवाय डिपॉझिट अनक्लेम्डला जाणार नाही यासाठी काळजी इथून पुढे घेतली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जे कायदेशीर दावेदार आहेत त्यांना यावर क्लेम करता येईल असं त्यांनी सांगितलं.

शक्तीकंद दास म्हणाले की, आरबीआयने अशा हक्क नसलेल्या ठेवी आणि त्याचे ठेवीदार किंवा लाभार्थी यांच्या डेटासाठी एक वेब पोर्टल तयार केले आहे. अशा दावा न केलेल्या ठेवींवर योग्य माहिती दिल्यास विविध बँकांच्या ठेवीदारांची माहिती उपलब्ध होईल. हे एआय टूल्सच्या आधारे डिझाइन केले जाईल. अनक्लेम्ड डिपॉजिट म्हणजे काय?CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा कोणत्याही ठेवीदाराने गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्याही खात्यात कोणताही निधी जमा केला नाही किंवा त्यातून कोणतीही रक्कम काढली नाही, तेव्हा या कालावधीत खात्यात असलेली रक्कम दावा न केलेली ठेव मानली जाते. या प्रकारची खाती इनअॅक्टिव समजली जातात. अशा ठेवी हक्क नसलेल्या म्हणून घोषित केल्यानंतर, बँकांना ही माहिती आरबीआयला द्यावी लागेल.
अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे खात्यावर कोणत्याही प्रकारचं ट्रॅन्झाक्शन झालं नाही. खातेधारकाचा मृत्यू किंवा इतर कोणतीही कारण असू शकतात. जेव्हा खातं उघडलं जातं तेव्हा नॉमिनी डिटेल्स भरले जात नाहीत. मग ग्राहकाच्या मृत्यूनंतर खातं तसंच राहातं. RBI ने 2014 रोजी बँकांसाठी एक निर्देश जारी केला आहे. प्रत्येक वर्षी बँकांना खात्याचा रिव्यू करायला सांगितला जातो. यामध्ये पत्ता, नॉमिनी आणि संबंधित गोष्टी ग्राहकांना विचारून अपडेट केल्या जातात. याशिवाय खातं अनिएक्टिव्ह असेल तर अॅक्टिव्ह करण्याचा सल्ला दिला जातो.
यावर क्लेम करता येतो का? असा ठेवीदार त्याच्या खात्यात जमा केलेली रक्कम प्राप्त करण्याचा दावा करू शकतो. यासाठी अट अशी आहे की ही रक्कम त्यांचीच असल्याचा पुरावा किंवा कागदपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. बँकांमधील केवायसी प्रक्रियेअंतर्गत आता अशा ठेवीदारांसाठी हे काम सोपे झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम