पुण्यातील दहशतवाद्यांबाबत एटीएसचा मोठा खुलासा : पंख्याच्या पाईपमध्ये ठेवले होते लपवून !
बातमीदार | ३० जुलै २०२३ राज्यातील पुणे जिल्ह्यात मागील महिन्यात दोन दहशत वाद्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. हे दहशतवाडी ज्या ठिकाणी रहात होते त्या घरातून एटीएसला एक धक्कादायक कागद सापडला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील पंख्याच्या पाईपमध्ये लपनून ठेवण्यात आलेल्या या कागदावर बॉम्ब बनवण्याची माहिती असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान कोंढवा येथे हे दोघे दहशतवादी राहत होते, त्या घरात एटीएसकडून तपासणी करण्यात आली. तेव्हा फॅनच्या पाईपमध्ये बॉम्ब बनवण्याची सर्व माहिती हाताने लिहीलेला कागद लपवून ठेवला होता. यावर बॉम्ब बनवण्याचा सर्व प्लॅन पेनने लिहीण्यात आलेला होता. हा कागद आता एटीएसच्या हाती लागला आहे. तसेच यासोबतच अॅल्युमिनीयमचे पाईप, काच आणि बुलेट्स देखील घरातील सिलींगमध्ये सापडल्या आहेत, पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील बधाई चौकातून आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुल साकी (वय २४, दोघेही रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट क्रमांक १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली होती. तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडील गुन्ह्यात फरारी असल्याचे आणि त्यांच्याविरुध्द प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम