‘बिग बॉस सीझन १७’ : पहिल्याच शोमध्ये सेलिब्रिटींचा राडा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

अभिनेता सलमान खानचा शो असलेल्या व खूप कमी कालावधीत लोकप्रिय झालेला रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन 17’ रविवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमान खानच्या या शोचा भव्य प्रीमियर नुकताच पार पडला. या शोमध्ये १७ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेतली. महत्वाचे म्हणजे घरात जात नाही, एकमेकांची ओळख होत नाही तोवरच या सेलिब्रिटींनी भांडण करायला सुरूवात केली. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये आता भांडण, राडे प्रेक्षकांना पहायला मिळणार हे नक्की.

बिग बॉसच्या घरामध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली. त्यांच्यासोबत नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्या, अनुराग ढोबळ, जिग्ना व्होरा, मुनावर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना राणा खान आणि सोनिया बन्सल या सेलिब्रिटींनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला. या सर्व स्पर्धकांनी धमाकेदार एन्ट्री केली. आता हे सर्व सेलिब्रिटी या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी एकत्र धमाकेदार एन्ट्री घेतली. ‘उडारियां’फेम अभिनेता अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय यांनी बिग बॉसच्या सेटवर येताच भांडण सुरू केले. दोघेही सलमान खानसमोर भांडू लागले. दोघांनीही एकमेकांवर आपला राग एकमेकांवर काढला. यावेळी ईशा मालवीय इतकी भावुक झाली की ती रडायला लागली. शेवटी सलमान खानने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसच्या सेटवर ईशा आणि अभिषेक यांच्यातील भांडण खूपच रंगले. पहिल्याच दिवशी घरामध्ये एन्ट्री करताच त्यांचे भांडण सुरू झाल्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघांनी एकमेकांवर आरोप केले. ईशाने अभिषेकवर शारीरिक हिंसक असल्याचा आरोप केला होता. अभिषेकने सांगितले की, ईशाने त्याच्या चेहऱ्यावर नखं मारली होती. दोघांनीही त्यांच्या मनात असलेली कटुता बाहेर काढली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम