ठाकरेंचा मोठा प्लान : पक्षाला मिळाले नवे सहा चेहरे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिंदे व ठाकरे गटात मोठे राजकारण सुरु असतांना आता ठाकरे गटाने आपला मोठा प्लान तयार करीत शिवसेना (ठाकरे गटा)च्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाने 6 नवनियुक्त नेत्यांची नावे आणि त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नव्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. नव्या कार्यकारिणी विस्तारामध्ये खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच, कार्यकारिणी विस्तारात पक्षाचे उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्यात पक्षवाढीस बळकटी मिळावी, यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव म्हणून सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर काम पाहणार आहे.

तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर) शुभांगी पाटील (नाशिक) जान्हवी सावंत (कोकण) छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या नियुक्तीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण १६ जणांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम