खाद्यतेलांच्या किमतीत वाढ ; ग्राहकांना फटका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

देशभरात आता सणासुदीची लगबग सुरु झाली असून यंदाच्या हंगामात भुईमूग आणि सोयाबीनचे तेल आणि बियांचे दर गडगडले आहेत. असे असताना बाजारात मागणी वाढल्याने इतर खाद्यतेलांच्या किमती मात्र वाढताना दिसत आहेत. सध्या बाजारात चांगल्या प्रतीची मोहरीची कमतरता दिसून येत आहे. सणासुदीमुळे मोहरीचे तेल आणि बियाणांना मागणी वाढली आहे. जागतिक बाजारात मागणी वाढल्याने पामतेलाचे दरही वाढले आहेत.

बाजारात सध्या भुईमुगाच्या तुलनेत सरकीपासून मिळणारे तेल खूप स्वस्त असते. त्यामुळे चमचमीत पदार्थ बनविणाऱ्या बड्या कंपन्या या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे सरकीच्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते बाजारात नव्या भुईमूग आणि सोयाबीनची आवक सुरु झाली आहे.

आयात खाद्यतेलांपेक्षाही शेंगदाणा तेल महाग
nअनेक प्रकारची खाद्य तेलांची विदेशातून आयात केली जाते. आयात केलेल्या या खाद्य तेलांच्या तुलनेत शेंगदाण्याचे तेल महाग असल्याने विक्रीला फटका बसला. सोयाबीनच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे.

ऐन सणासुदीत भुईमूग आणि सोयाबीनचे दर पडल्याने उत्पादक चिंतेत आहेत. लागवडीसाठी केलेला खर्च तरी निघावा या अपेक्षेने आता सोयाबीन उत्पादकांकडून किमान हमी भावाची मागणी केली जात आहे.

तेलांचे दर असे वाढले

दर वाढ-घट
मोहरी ५,६७५ १०० रु.
मोहरी दादरी १०,५५० ३५० रु.
शुद्ध मोहरी १,७८० – १,८७५* ४५ रु.
मोहरीचे घाण्याचे १,७८० – १,८९०* ४५ रु.
कच्चे पामतेल ७,८०० १०० रु.
सरकी तेल ८,४५० २५ रु.
सोयाबीन दाणे ४,६५० – ४,७०० १०० रु.
शेंगदाणा तेल ६,७५०-६,८०० ५२५ रु.
सॉल्वेंट रिफाईंड तेल २,३१५-२,६०० २५५ रु.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम