बिपरजॉयने मोठे नुकसान केले ; पंतप्रधान मोदी !
दै. बातमीदार । १८ जून २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मन की बातच्या 102व्या भागात, पीएम मोदींनी बिपरजॉय वादळाच्या वेळी कच्छच्या लोकांच्या धैर्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये एवढा विध्वंस झाला आहे, परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सज्जतेने अशा धोकादायक चक्रीवादळाशी लढा दिला तो अभूतपूर्व आहे.
पंतप्रधान म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींपुढे कोणाचेही चालत नाही, परंतु गत काही वर्षांत भारताने विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनत आहे. ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी निसर्ग संवर्धन हा एक मोठा मार्ग आहे.
हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो, परंतु पंतप्रधान मोदी 21 जून ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर असतील. अशा स्थितीत यावेळी आठवडाभर आधीच प्रसारित होत आहे. याबद्दल पीएम म्हणाले की, पुढच्या आठवड्यात मी अमेरिकेत आहे आणि तिथे खूप धावपळ होईल आणि म्हणून मला वाटले, तिथे जाण्यापूर्वी मी तुमच्याशी बोलावे.
पंतप्रधानांची मन की बात 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाली आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जाते. 30 मिनिटांच्या कार्यक्रमाने 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण केले आहेत. 22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त, मन की बात 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केली जाते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम