राज्यातील भाजप आमदार मध्यप्रदेश निवडणुकीच्या मिशनसाठी रवाना !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्रातील आमदार आज सकाळी मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक मिशन साठी मुंबई वरून इंडिगो विमानाने भोपाळ कडे रवाना झाले आहेत. या आमदारांमध्ये नितेश राणे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राम शिंदे यांचा समावेश आहे. जे त्यांच्या प्रदेशातील निवडणूक विजयाच्या रणनीतीमध्ये तज्ञ मानले जातात, त्यांचाच समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक मिशन साठी मुंबई वरून महाराष्ट्र भाजपचे आमदार रवाना झाले आहेत. हे आमदार मध्य प्रदेशातील प्रत्येक विधानसभेच्या जागेवरून दावेदारांचे पॅनल तयार करून केंद्रीय नेतृत्वाला अहवाल सादर करतील. मध्य प्रदेशातील निवडणुकीची संपूर्ण रणनीती गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात येत आहे. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आमदारांच्या अहवालाच्या आधारे केवळ तिकीटच ठरणार नाही, तर त्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवायची हेही ठरवले जाणार आहे. सध्या तरी पक्षाने आमदारांचे हे कामकाज गोपनीय ठेवले आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण तळ ठोकणार याचाही उल्लेख आहे. हे तज्ज्ञ आमदार प्रत्येक विधानसभेत पोहोचून विजय-पराजयाची शक्यता तपासून पक्षाला काय करायचे आणि काय करू नये हे सांगतील, असे नियोजन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम