अधिक श्रावण महिन्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला कोटी रुपयांचे उत्त्पन्न !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक भाविकांचे भक्तीस्थान असलेल्या पंढरपूर येथे अधिक श्रावण महिन्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, भाविकांनी मंदिर समितीला ७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

या कालावधीत ६ लाख ३९ हजार ९१७ भाविकांनी पदस्पर्श दर्शन व सुमारे ५ लाख भाविकांनी मुखदर्शन घेतले. नित्यपूजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा इत्यादी माध्यमांतून हे उत्पन्न मिळालेले आहे. महिनाभराच्या काळात मंदिर समितीला विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

२०१८ मध्ये २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यावर्षीच्या अधिक मासाच्या उत्पन्नात ४ कोटी ८६ लाख ९१ हजार ११३ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. अधिक मासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून, २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किमतीचे सोने व ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झाल्या असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम