घरगुती गॅसचा काळाबाजार; तिघांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे सिलेंडरचा काळाबाजार करण्याच्या घटनाही घडत आहेत. अशाच एका घटनेत पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या बळीरामपेठ भागातील गंगूबाई शाळेच्या मागील बाजूस एका टपरीत घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून त्याचा अवैधरित्या वापर व काळाबाजार केला जात असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता, त्यात गॅस भरण्यासाठीचे इलेक्ट्रीक मोटार, पंप, रेग्युलेटर नळ्या, रिकामे सिलेंडर तसेच दोन ऑटो रिक्षा असा एकूण ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी फिरोज खान सलीम खान (वय २८), पंडीत शिवराम शिरसाळे (वय ५७) व शेख खालीद शेख शफी (वय २४) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.कॉ. उमेश भांडारकर करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम