भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबीरात 74 रक्तदात्यांचे रक्तदान

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच सेवा पंधरवाडा निमित्ताने आज दि. १७/०९/२०२२ रोजी भडगाव शासकीय विश्रामगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते, शिबिरासाठी शहर व तालुक्यांतून रक्तदात्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून ७४ रक्ताच्या पिशव्याचे संकलन झाले, याप्रसंगी जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खा. उन्मेश दादा पाटील, रा.स्व.सेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. निलेशजी पाटील, भारतीय जनता पार्टी चे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे यांनी रक्तदाते व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, भाजपा भडगाव तालुका अध्यक्ष अमोल नाना पाटील, शहर अध्यक्ष बन्सीलाल परदेशी, रकदान शिबिराचे संयोजक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किरण शिंपी, सहसंयोजक युवा मोर्चा शहर अध्यक्ष विशाल चौधरी,भाजपा सरचिटणीस अनिल पाटील, माजी सैनिक आघाडीचे तालुका अध्यक्ष समाधान पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस प्रदिप सोमवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा नुतनताई पाटील, सचिन पाटील, भडगाव शहर सरचिटणीस बापु शार्दुल, वसंत वाघ, भुषण पाटील , शेखर बच्छाव, विकी पाटील, शुभम सुराणा, विकास पाटील, दत्तात्रय पाटील, रविंद्र पाटील, चेतन पाटील, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम