किरीट सोमय्यांना दणका : या प्रकरणात होणार चौकशी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे गटाच्या नेत्याची चौकशी मागणी करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. आता किरीट सोमय्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधातील न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याच्या चौकशीचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील फसवणूक केल्याप्रकरणाची न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी चौकशी करतील. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत 24 एप्रिल 2023 पर्यंत सक्तीच्या कारवाईपासून संरक्षणही दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम