ब्रेकिंग : गुजरातमध्ये इमारत कोसळून 4 जण अडकले ढिगाऱ्याखाली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  देशभर पावसाचा धुमाकूळ सुरू असताना राज्यातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून गाव संकटात सापडले होते ती घटना ताजी असतांना आज गुजरात राज्यात जुनागडमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे काडियावल परिसरात एक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले आहेत.

ही इमारत भाजी मंडईजवळ होती आणि खाली दुकाने होती. भाजी मंडईमुळे येथे मोठी गर्दी असते. अशा स्थितीत अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली 12-15 लोक दबले गेल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे. पोलिस आणि एसडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.

गुजरातमधील जुनागड शहरात शनिवारी 4 तासांत 10 इंच पाऊस झाला. यानंतर शहर जलमय झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही जुनागड पुराच्या पाण्यात बुडाला. अनेक भागांत शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली. जे भाग पाण्यात बुडाले होते, तेथील लोकांचे सर्व सामान उद्ध्वस्त झाले आहे. पुराच्या तडाख्यात आलेल्या शेकडो जनावरांचे मृतदेहही सापडले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम