मोदींना ठार मारण्याचे कट जगामध्ये शिजत आहेत – ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण

advt office
बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | १३ एप्रिल २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना जोर आला आहे. सामान्य मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सत्तांतर होत आहे की की केंद्रात पुन्हा मोदी राज पाहायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. यातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. ते गुहागर येथे बोलत होते.

“पुन्हा घडाळ्याचे काटे उलटे फिरायला निघाले आहेत. मोदींना ठार मारण्याचे कट जगामध्ये शिजत आहेत. मी जबाबदारीने बोलत आहेत. हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला तर जगात देश बलशाली होईल. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेवून कामाला लागला. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय.”, असे मधुकर चव्हाण म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम