
या कारणासाठी साजरा केला जातोय ‘गुड फ्रायडे’ !
दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ । देशात अनेक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जात असतात त्यातील एक म्हणजे गुड फ्रायडे या दिवसाचं ख्रिश्चन समाजात मोठं महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ गुड फ्रायडेचा हा दिवस साजरा केला जातो.
आजच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. अनेक ख्रिस्ती बांधव आजच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ प्रार्थना करतात. ड फ्रायडे नेहमी इस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. या वर्षी आज, म्हणजेच 7 एप्रिललला गुड फ्रायडे साजरा करण्यात येत आहे. आजचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे लोक हा दिवस साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करत असतात. त्यानंतर आजच्या दिवशी चर्चच्या प्रार्थनेमध्ये येशूच्या बलिदानाचे स्मरण केलं जातं. येशू ख्रिस्ताने जगाला प्रेम आणि करुणाचा संदेश दिला आहे. रोम राजाच्या एका आदेशानंतर येशूला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आलं होतं. त्या काळात अंधविश्वास आणि खोट्या समजूती पसरवणाऱ्या धर्मगुरुंचा सुळसुळाट झाला होता. अशा परिस्थितीत येशूने समाजाला योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येशूच्या प्रसिद्धीत वाढ झाली.
येशूचे कार्य हे अनेकांना पटणारे नव्हते. त्यांनी येशूच्या विरोधात रोमच्या राजाला भडकावलं. त्यानंतर येशूला सुळावर लटकवण्याचा निर्णय रोमच्या राजाने घेतला. येशूने आपले सगळे जीवन समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, त्याला इस्टर संडे म्हटलं जातं, येशू पुन्हा जीवंत झाला आणि त्यापुढे 40 दिवस लोकांच्यात जाऊन त्याने संदेश दिला असं सांगितलं जातंय. येशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडेच्या रुपात साजरे केले जाते. या वर्षी 9 एप्रिलला इस्टर संडे साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशीही जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. गुड फ्रायडेला बायबलच्या अंतिम सात वाक्यांचं स्मरण केलं जातं.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम