पण निवडून येणार मोदीच ; जळगावात मंत्री आठवलेंचा नेत्यांना टोला !

बातमी शेअर करा...

बातमीदार  | १ सप्टेंबर २०२३

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.३१ ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी राज्यमंत्री रामदास आठवले हे आले असतांना त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक होत आहे.

या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांनी जिवाची मुंबई करावी, त्यांनी कितीही कांगावा केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात पुन्हा आमचे सरकार येणार, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी जळगावात व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढविल्या जातील. मात्र, काही ठिकाणी एकत्र येणे शक्य नसेल तर स्वतंत्र लढू व सरकार स्थापनेच्या वेळी एकत्र येऊ, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी भुसावळ येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकाचे नामकरण मंत्री आठवले यांच्या हस्ते झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम