मंत्रीमंडळ विस्तारत १०० टक्के मंत्री होणार ; शिंदे गटाच्या आमदाराचा विश्वास !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहे तर काहीना १०० टक्के खात्री असल्याची देखील त्यांनी कबुली दिली आहे.

त्यातच ठाकरे गटाला अगदी शेवटच्या क्षणाला सोडून शिंदे यांना सामील झालेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आपण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सभेत सांगितलं आहे. “शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे त्यामुळे आपण यावेळी १०० टक्के मंत्री होणार” असं ते म्हणाले. त्यामुळे सध्या चर्चा सुरू झाल्या असून खरोखर बांगर यांना मंत्रीपद मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेशी बंड करून गुवाहटीला गेले होते त्यावेळी शिंदे गटावर सडकून टीका करणारे संतोष बांगर पुढे होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या रांगेत जाऊन बसले आणि बहुमतासाठी शिंदे यांच्याकडून मत दिले त्यामुळे ते पुढे अनेक दिवस चर्चेत राहिले. मध्यंतरी त्यांनी एका कार्यकर्त्याला आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. याची ऑडिओ क्लीपसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर भाजपकडून नाराज असलेल्या शिंदे गटातील व्यक्तींच्या यादीमध्ये संतोष बांगर यांचासुद्धा सामावेश असल्याचं बोललं जात होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम