नव्या वादाला तोंड : सहा कुस्तीपटूंना चाचणीतून सूट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह सहा कुस्तीपटूंना चाचणीतून सूट देण्यात आली आहे. या कुस्तीपटूंना सूट दिल्याने ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त संतापला. तो म्हणाला- ज्या खेळाडूंनी आंदोलन केले त्यांचे हेच उद्दिष्ट होते का? कुस्तीसाठी हा काळा दिवस आहे. भारताचे माजी प्रशिक्षक कृपा शंकर यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अॅडहॉक पॅनेलने सहा आंदोलक कुस्तीपटूंसाठी आगामी आशियाई स्पर्धा आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया केवळ एका सामन्याची स्पर्धा बनवून टाकली आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या कुस्तीपटूंना केवळ चाचण्यांमधील विजेत्यांना पराभूत करावे लागणार आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगिता फोगट, सत्यव्रत कादियान आणि जितेंद्र किन्हा हे सहा कुस्तीपटू या यादीत आहेत. हे कुस्तीपटू 5 ते 15 ऑगस्ट दरम्यान झालेल्या चाचण्यांमधील विजेत्यांशी लढतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम