
दै. बातमीदार । २३ ऑगस्ट २०२२ । शाहूनगर मधील रहिवासी मोहम्मद सादिक हे बस स्थानकाजवळ हॉटेलचा व्यवसाय करतात त्यांची मुलगी जुबेरिया यांना यादगार बिर्याणी सेंटरचे शेख सत्तार हे आपला मुलगा नावे काशीद साठी लग्ना ची बोलणी करण्यासाठी आले होते. सर्व नातेवाईक चर्चा करीत असताना दोघेही जवळचे नातेवाईक असल्याने व बसलेल्यांमध्ये सुद्धा एकमेकांशी संबंधित नातेवाईक असल्याने सत्तार शेख यांचा मोठा मुलगा उसामा शेख व लहान मुलगा क़ासिम शेख यांनी उपस्थितांसमोर प्रस्ताव मांडला कि जर आपण नातेवाईक आहोत, अगदी जवळचे संबंध आहेत तर मग साखरपुडा (मंगनी) का न करता सरळ आजच निकाह (विवाह) का नाही होउ शकत? या दोघ तरुणांचा प्रस्ताव वधु चीआई सलमा बी व वराची आई अस्मा बी यांच्यासमोर सादर केला गेला त्यांनी सुद्धा याला होकार दिला. वधूचे वडील मोहम्मद सादिक वराचे वडील सत्तार शेख यांनी सुद्धा यात पुढाकार घेऊन कल करे सो आज कर या म्हणी नुसार संध्याकाळी ५.३० वाजता असर च्या नमाजच्या वेळेस नूरानी मस्जिद ,शाहुनगर मध्ये लावावे असे ठरले.
विना साखरपुडा करत केले डायरेक्ट लग्न
संध्याकाळी मुफ्ती हारून नदवी यांनी हे लग्न नूरानी मस्जिद लावला.
नुरानी मस्जिद चे इमाम मौलाना अख्तर नदवी व मौज्जन याकूब शेख यांनी समन्वयक ची भूमिका निभावली तर या निकाह साठी औरंगाबादचे शेख जमील मुसा व सिल्लोड चे अन्वर पठाण यांनी साक्षीदाराची भूमिका तर वकिलाची भूमिका वधूचे वडील सादिक शेख यांनी अदा केली.
वधू ने आपला मेहेर दीड तोळे सोने (१५ ग्रॅम) ठेवल्याने वर मोहम्मद काशीद यांनी निकाहच्या वेळी वधूला दीड तोळ्याचे चे दागिने उपलब्ध करून दिले अशाप्रकारे अत्यंत साध्या व कोणताही गाजावाजा कोणत्याही पंगती बिना हा निकाह – लग्न सोहळा पार पडला.
यावेळी शाहूनगर मधील नमाजींसोबत जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांची विशेष उपस्थिती होती. समाजात अशाच प्रकारचे निकाह होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुफ़्ती हारून नदवी यांनी प्रवचनाद्वारे व्यक्त केले तर फारुक शेख यांनी जाहीरपणे असे सोहळे आम्ही आपल्या घरात, गल्लीत व शहरात केल्याने हा जळगाव पॅटर्न म्हणून सगळीकडे एक चांगला संदेश जाईल व त्याचे अवलंबन करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
वर वधू तर्फे सत्तार शेख यांनी प्रथमअल्लाह चे आभार मानून उपस्थिता चे सुद्धा आभार व्यक्त केले.
चॅनेल ला सब्स्क्राईब करा
https://youtube.com/channel/UCmsDeG1dRlBB4PL1Pg_SbTQ
उपस्थित वर सोबत डावीकडून उसामा शेख,वधूचे वडील सादिक शेख, वर काशीद शेख, मुफ़्ती हारून नदवी,वराचे वडील सत्तार शेख व फारुख शेख आदी दिसत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम