उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

राज्यभरात गेल्या काही महिन्यापासून अनेक राजकीय नेत्यासह उद्योजकांना धमकी येवू लागल्या आहेत तर आता जुने विदर्भवादी कार्यकर्ते बाबा मस्की आणि शोभा मस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना समाजमाध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजुरा शहरातील रहिवासी असलेले मस्की दाम्पत्य स्वतंत्र विदर्भासह विविध आंदोलनांत त्यांचा सातत्याने सहभाग असे. त्यांनी नुकतीच समाजमाध्यमात एक व्हिडीओ पोस्ट प्रसिद्ध केली असून, त्यात त्यांनी स्वतंत्र विदर्भ, शेतकऱ्यांचे प्रश्न, तसेच वन्यजीवांकडून होणारे पिकांचे नुकसान आदींबाबत भाष्य करताना फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही चित्रफीत सर्वत्र पसरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात मस्की दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम