अंधेरी विधानसभेत उमेदवार शिंदे गटाने पळविला ; जयंत पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । गेल्या दोन दिवसापासून निवडणूक आयोगाने चिन्ह ज्या निवडणुकीसाठी दिले त्याच मतदार संघात पोटनिवडणूकित उमेवारीहून वादग सुरु आहे. ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांचे नाव घोषित देखील केले आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुरजी पटेल यांनी मतदारसंघांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र, असे असताना ऋतुजा लटके यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षांमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.

अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवने, ही योग्य बाब आहे का?असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपने ज्याप्रमाणे शिवसेना फोडली, शिवसेना मध्ये झालेली बंडाळी ही भाजपप्रणित होती. त्याचप्रमाणे अंधेरी पोट निवडणुकीत देखील साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत उमेदवार पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील म्हणाले. अशाने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात कोणताच उमेदवार उभा राहणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उमेदवार युतीचाच विजयी होईल- सामंत
अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, या पोटनिवडणुकीत जो उमेदवार असेल तो युतीचाच असेल आणि युतीचा उमेदवार बहुमताने विजय होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. दैनिक सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या टिकेलाही त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम