‘एकनाथराव, हि फुट वाढतच गेली घरातही फुट पडतेय ; नाना पाटेकर गहिवरले

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेला खिंडार पडली आणि राज्याच्या राजकारणाला नवं वळण लागलं. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदारांच्या साथीनं पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी बंडखोरी केली. शिंदे गटानं कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा ठोकला आहे. शिवसेना नक्की कोणाची याची कायदेशीर लढाई सुरू आहे. अशातच, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नाना पाटेकर यांनी शिवसेनेत झालेल्या गटबाजीबाबत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?
‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं काय करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा भाबडा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य मतदार म्हणून विचारला. उद्या तुम्ही या कुटनितींना राजकारणाचं नाव द्याल, असं म्हणत पक्षामध्ये माजलेल्या या दुफळीवर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं, तो मतदारांचा आदरच केला. 2019 ला जे होणं अपेक्षित होतं ते आम्ही केलं. मतदारांनी सेना-भाजप युतीला निवडून दिलं. त्याप्रमाणे सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच तसं झालं नाही. पण, आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं’, यावर प्रतिप्रश्न करत त्यासाठी अडीच वर्ष का लागली? अशी गुगलीही नानांनी टाकली. यावर प्रयत्न सुरु होता पण, तीन महिन्यांपूर्वी त्याला यश मिळालं असे उत्तर फडणवीसांनी दिलें.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम