रांजणी येथे होमीओपॅथीक महाविद्यालय व रूग्णालयास केन्द्र शासनाची मान्यता

सर्वसामान्य नागरीकांना मिळणार मोठा दिलासा

बातमी शेअर करा...

 

 

 

औरंगाबाद दि २८ ऑगस्ट |  जामीया इस्लामीया इशातुल उलूम अक्कलकुवा संचालित उमर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालना येथे नुकतेच शैक्षणीक. वर्ष २०२२-२३ साठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बीएचएमएस. कॉलेज सुरु करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

वर्ष २०२२-२३ पासून या ठिकाणी हे कॉलेज सुरु करण्यासाठी प्रस्ताव नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करण्यात आला होता.त्यामुळे Medical Assessment & Rating Board for Homoeopathy, NCH यांच्या समितीकडुन सदर महाविद्यालयाचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली, तेव्हा सर्व सुई सुविधा व नियमित सुरु असणारे हॉस्पिटल, पेशंटची व्यवस्था व नियमीत घेतली जाणारी काळजी, व इतरही मानकांची असलेल्या पुर्ततामुळे तज्ञ समीतीने समाधान व्यक्त केले. त्यानुसार सदर महाविद्यालयाला Medical Assessment & Rating Board for Homoeopathy, NCH नवी दिल्ली यांच्याकडुन मान्यता पत्र प्राप्त झाले असून, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या बीएचएमएस अभ्यासक्रमास सत्र २०२२-२३ पासून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या संस्थेचे संस्थापक, मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांनी या बद्दल समाधान व्यक्त केले असुन, महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून वैद्यकीय क्षेत्रात आपले भवितव्य घडवावे असे आवाहन केले आहे.सदर महाविद्यालयसाठी मौलाना हुजैफा वस्तानवी, उवेश वस्तानवी यांनी सहकार्य केले. तसेच रांजणी येथील मौलाना नईम, प्राचार्य डॉ. सोनल मिठावाला, कार्यालयीन अधिक्षक शेख अखलाक अहेमद आदींनी परिश्रम घेतले.

दरम्यान जामिया अक्कलकुवा या संस्थेचे बदनापूर येथे एमबीबीएस हॉस्पिटल मेडिकल कॉलेज देखील यशस्वीपणे सुरू आहे आता रांजनी सारख्या भागात होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे संस्थेचे जिल्ह्यात दोन वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असून यापासून सर्वसामान्य गरीब लोकांना मोठा लाभ होत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम