पावसाळी अधिवेशनात भूमिपुत्र आमदारांनी दाखविला खान्देशी बाणा… -आ.अनिल पाटील सतत फ्रंट लाईनवर राहिल्याने ठरले कौतुकाचे मानकरी…

बातमी शेअर करा...

अमळनेर-(आबिद शेख)महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात आपल्या शैलीने खान्देशी बाणा दाखविण्याची परंपरा यापूर्वी काही तत्कालीन आमदारांनी रुजविली असताना यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विधी मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी पहिल्या दिवसांपासून फ्रंट लाईन वर राहून जोरदारपणे मुद्देसूद भाषण करणे असो किंवा सत्ताधारी मंडळींना नामोहरम करणे असो यात प्रचंड आक्रमक राहिल्याने विशेष चर्चेत ते आले आहेत.
आमदार अनिल पाटील जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर तीन जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असून याव्यतिरिक्त काँग्रेसचा रावेर मतदारसंघात एकमेव आमदार आहे,तर जळगाव जिह्यात शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटासोबत गेल्याने महाविकास आघाडी चा विचार करता जळगांव जिल्ह्यातून विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून एकमेव आमदार अनिल पाटलांवर जवाबदारी होती तर आ एकनाथराव खडसे विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी वरिष्ठ सभागृहात बाजू मांडली,विधी मंडळ मुख्य पक्ष प्रतोद म्हणून मोठी जबाबदारी आ अनिल पाटील यांच्यावर असल्याने सुरवातीपासून सभागृहात आक्रमक राहत चुकीच्या बिलाना मुद्देसुपणे विरोध केला एवढेच नव्हे तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील तेवढेच आक्रमक राहून संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतले.

थेट सरपंच आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीस मुद्देसूद विरोध

नगरविकास विभागाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने थेट जनतेतून सरपंच निवडीसंदर्भात सरकारने मांडलेल्या बिलावर विरोधी पक्षाच्या वतीने भाषण करताना आमदार पाटील म्हणाले की एखाद्या लहान समाजाचा व्यक्ती अतिशय चांगले काम करीत असेल किंवा अभ्यासू वृत्तीमुळे तो सरपंच किंवा नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्यास लायक ठरत असेल तर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे सदस्यांमधून त्याला त्या पदावर बसविण्याचा न्याय दिला जाऊ शकतो मात्र जर जनतेतून त्याला सरपंच किंवा नगराध्यक्ष पदावर निवडायचे म्हटल्यास त्या गावातील किंवा शहरातील मोठ्या समाजाची मंडळी त्याला कधीही त्या पदावर जाऊ देणार नाही यामुळे एकप्रकारे हा अन्यायच आहे,तसेच अनेक लोकनियुक्त नगराध्यक्ष किंवा लोकनियुक्त सरपंचानी संपुर्ण पाच वर्षे मनमानी कारभार करून सदस्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे लोकनियुक्त ही पद्धतच चुकीची व अन्यायकारक असल्याने पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून नगराध्यक्ष किंवा सरपंच पदाची निवड करणे योग्य राहील अशी भूमिका त्यांनी रोखठोकपणे मांडली,सदर भाषणाच्या संपुर्ण सभागृह देखील शांत असल्याने सारेच जण भाषण ऐकत होते.

अतिवृष्टीच्या पैश्यांसाठी जोरदार हल्लाबोल

दुष्काळ संदर्भात विरोधी पक्षसंदर्भात 293 अंतर्गत सभागृहात प्रस्ताव मांडला असतां यावेळी देखील आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे पैसे या शासनाने न दिल्याने जोरदार हल्लाबोल केला,यावर बोलताना ते म्हणाले की अमळनेर मतदारसंघासह जिल्ह्यात 2019 पासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते,त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी निधी वितरित करण्यास मान्यता दिली असताना हे सरकार तो पैसा वितरित करीत नसल्याने अनिल पाटलांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला,आमचा शेतकरी राजा आधीच पिळला गलेला असताना या शासनाला त्याचे काहीच देणेघेणे नाही,केवळ राजकारण म्हणून त्यांचा पैसा अडवून ठेवणे हे मोठे पाप असून किमान बळीराजा च्या भावनांशी न खेळता त्यांचा पैसा त्वरित खात्यावर जमा करा अशी जोरदार मागणी त्यांनी केली,याव्यतिरिक्त पातोंडा सर्कल मधील शेकडो हेक्टर शेती सतत पाण्याखाली राहून नापीक होत असल्याने यावर देखील शासनाला उत्तर देण्यास त्यांनी भाग पाडले.

सत्ताधारीना दाखविले गाजर अन,,,

विधी मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी मंडळीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत असताना आमदार अनिल पाटील हे गाजराची माळ गळ्यात घालून हजर होत जोरदार घोषणाबाजी करून संपुर्ण परिसर हादरवून सोडला,हा प्रकार सत्ताधारी आमदारांना चांगलाच जिव्हारी लागल्याने नंतर काय घडले तो प्रकार उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर लाईव्ह पाहिल्याने अनिल पाटील राज्यभर प्रकाशझोतात आले.
एकंदरीत आमदार अनिल पाटील यांनी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देखील मने जिंकली असून जळगाव तथा खान्देश मधून महाविकास आघाडी आवाज दाबला जाऊ शकत नाही हेच त्यांनी सिद्ध करीत आपण भविष्यात जिल्हा किंवा विभागाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहोत हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम