
मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
दै. बातमीदार । २६ जानेवारी २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आज शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघात जावून तुफान फटकेबाजी करीत शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “येणाऱ्या काही दिवसात मी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. अस्सल निष्ठावंत शिवसेनेत आहेत. राजन विचारे, केदार दिघे हे निष्ठावंत आहेत, या गोष्टींचे समाधान आहे. बाकिचे विकल्या गेले. ते कुठल्या भावाने विकल्या गेले हे सर्वांना माहित आहे. न्यायासाठी लाथ मारावी हे शिवसेनेचे ब्रिदवाक्य आहे. अस्सल निष्ठावंत शिवसैनिक इकडे आहेत.”
शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जम्मू-कश्मीरमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की तिकडे देखील बंडखोरांविरोधात घोषणा केल्या जातात. देशाच्या कानाकोपऱ्यात ह्या घोषणा गेल्या आहेता (५० खोके एकदम ओक्के). मात्र यामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते. ते विकले गेले. ही महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी आहे. गेले ते जाऊद्या पण जे अस्सल निखारे शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहीले, हे उद्या शिवसेनेत मशाल पेटवतील.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम