मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये उद्या महत्वाची बैठक !
दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक होत न्यायालयात जात आहे. त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील ताज प्रेसेंडेंट येथे ही बैठक होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम