मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आंबेडकरांची भेट; राजकीय चर्चेला उधान
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ राज्यातील शिंदे गटाला केद्रात मंत्री पद मिळणार असल्याची बातमी असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदेगट आणि वंचितच्या युतीची चर्चा होत आहे. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. ठाकरे- आंबेडकर यांनी २० नोव्हेंबरला एकाच मंचावर आले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु झाली होती.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होता आंबेडकरांच्या राजगृही ही भेट झाली. यावेळी दीपक केसरकर आणि भावना गवळीही उपस्थित होत्या. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यामध्ये कुठलंही राजकीय समीकरण नाही, कृपया गैरसमज करु नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं भूषन आणि त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू एवढंच या भेटीत होतं. या भेटीमध्ये कोणतही राजकीय चर्चा झाली नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावेळच्या वापरातल्या वस्तू, ही इमारत बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहीली आहे, त्यावेळीची त्यांची वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, खुर्ची त्यांची पुस्तके त्यांच्या वापरातल्या वस्तू हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला. मी आज सदिच्छा भेट घेतली आहे. या वास्तूचं पावित्र्य हे बाबासाहेबांचे वास्तव्य आणि पदस्पर्शाने पुनित झाले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम