नागपुरात झाले बाल विवाहमुक्त भारत अभियान

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बाल बिवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. लोक समूहाला बाल विवाह बद्दल जागरूक करणे आणि त्यांची विचारसरणी आणि वर्तन बदलणे,आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे. या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत महिमा बहुउ्देशीय संस्था चे पुढाकाराने नागपुर मधील 100 गावात कॅण्डल पेटवून बाल विवाह बंद करण्याची शपथ घेण्यात आली.

सामूहिक शपथ, रैली, कँडल मार्च चे आयोजन शाळा, महाविद्यालये,अंगणवाडी, समुदाय संघटन, स्वयंसेवी संस्था ,सामाजिक कार्यकर्ता सोबत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बाल विवाह मुक्त भारत अभयानांतर्गत शपथ घेण्यात कैलाश सत्यार्थी चिल्ड्र्स फाऊंडेशन व महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम नागपूर सह महाराष्ट्रात अनेक भागात यशस्वी रित्या राबविण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम