सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगावतर्फे बालनाट्याचा प्रयोग

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०९ जुलै २०२२ । जळगाव शहरातील सृजन कला ॲकडमी आणि नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग  (दि. १०) काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रयोगासाठी जैन उद्योग समुहाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

या बालनाट्यामध्ये सृजन कला ॲकडमीतर्फे घेण्यात आलेल्या बालनाट्य शिबिरातील कलाकारांना संधी देण्यात आली असून, ह्या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शक तरुण रंगकर्मी अमोल ठाकूर यांनी केले आहे. या बालनाट्यासोबतच धनश्री जोशी यांचे बुरगुंडा हे भारुड सादर होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमंत कुलकर्णी यांच्याहस्ते होणार असून, या नाट्याचा प्रयोग (दि. १०) सायंकाळी सात वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक येथे होणार आहे. जैन उद्योग समुहाच्या सहकार्यातून होत असलेल्या या बालनाट्याच्या प्रयोगाला मोफत प्रवेश असून, सर्व नाट्यरसिकांनी या प्रयोगास उपस्थिती देवून बालकलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सृजन कला ॲकडमी, नाट्यरंग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम