आजचे राशीभविष्य, रविवार १० जुलै २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२२ । मेष:- हातून एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल.

वृषभ:-

अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल.

मिथुन:-

अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल.

कर्क:-

भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

सिंह:-

चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.

कन्या:-

कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल.

तूळ:-

धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका.

वृश्चिक:-

तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही.

धनू:-

जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल.

मकर:-

व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा विश्वास संपादन करावा.

कुंभ:-

मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी.

मीन:-

व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम