पंकजाना रिप्लेस करण्यासाठी चित्राताई ; अधारेंचा भाजपवर हल्लाबोल !
दै. बातमीदार । १८ जानेवारी २०२३ । राजकारणातील कोणता पक्ष कोणत्या नेत्याची मदत करीत आहे किवा विरोध करीत आहे हे अजूनही कुणाच्या काहीच लक्षात येत असतांना दिसत नाही. तर भाजप नेत्या मुंडे यांनी शिवसेनेत यावे असे आमंत्रण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांना वारवार दिले असतांना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आता भाजपवर हल्लाबोल करीत पंकजा यांना धीर दिला आहे.
अंधारे म्हणाल्या, “ज्या बायकांना चळवळीचा बेस नाही त्यांना भाजप राजकारणात आणतंय. पंकजा मुंडेंचा मास बेस आहे. मराठवाड्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. भाजपच्या अनेक जागा या पंकजा मुंडे यांच्यामुळं निवडून आल्या आहेत. मोनका राजळे, नमिता मुंदडा, बुलढाण्याची जागा असेल अशा अनेक जागा पंकजा मुंडेंमुळं निवडून आल्या आहेत हे त्रिवार सत्य आहे”
या पंकजा मुंडेंना रिप्लेस करण्यासाठी भाजप ज्या बायकांना चळवळीचा बेसच नाही त्यांना पुढे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतंय. उलट या सर्व बायकांना आपलं राजकीय अस्तित्व जपायचं असेल तर त्यांनी पंकजा मुंडेंकडून शकलं पाहिजे. स्टेटमेंट काय द्यावेत, कसे द्यावेत, किती काम करावं. नुसत्या नॉन इश्यूजवर उठसूठ पत्रकार परिषदा घेणं यानं काही काम होत नसतं, अशा शब्दांत अंधारे यांनी भाजपवर सडकून टीका केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम