किसान वासंतिक शिबिर-२०२२ चा सांगता समारोह उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

*_किसान वासंतिक शिबिर-२०२२ चा सांगता समारोह उत्साहात संपन्न…!!!!_*

भडगाव (वार्ताहर)-

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत “किसान स्पोर्ट्स अकॕडमी,भडगाव” च्या वतीने इनडोअर हॉल,डी.एड.कॉलेज,भडगाव येथे आयोजीत “किसान समर कॕम्प -२०२२” चा सांगता समारंभ सहभागी खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा दुध फेडरेशनच्या संचालिका तसेच संस्थेच्या सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील तसेच संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळा तथा महाविद्यालयाचे प्राचार्य,मुख्याध्यापक आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते थोर व्यक्तींचे प्रतिमेस माल्यार्पण तथा पुजन तसेच विद्येची देवता माता सरस्वतीस वंदन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
वासंतिक शिबिरात प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या स्केटींग,तायक्वांदो,चित्रकला तथा नृत्यकलेचे प्रात्यक्षिक रंगारंग कार्यक्रमात सहभागी खेळाडूंनी मोठ्या उत्साहात उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केले,त्यांचे थरारक कौशल्य बघून मान्यवरांनी तसेच पालकांनीही दाद दिली.
अकॕडमीच्या वतीने शिबीरासाठी लाभलेले स्केटींग प्रशिक्षक सुनिल मोरे,आतिक साटोटे,तायक्वांदो प्रशिक्षक अबरार बेलदार,अबुजार खान,प्रेम देवरे,धीरज महाजन,अनिकेत शिंदे,जयेश पाटील,आयान खान,कुसूम पाटील,कलाशिक्षक शरद पाटील,नृत्य प्रशिक्षक प्रदीप राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.
अकॕडमीतर्फे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,डॉ.पुनमताई पाटील,उपप्राचार्य बी.वाय.पाटील,तसेच प्रा.सतीश पाटील आदिंचा सत्कार विविध ठिकाणी मिळालेल्या यशाबद्दल करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.पुनमताई पाटील यांनी मनोगतातून किसान स्पोर्ट्स अकॕडमीतर्फे आयोजीत शिबीरातील सहभागी खेळाडूंचे कौतुक करुन त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकांचे आभार व्यक्त करीत,भविष्यात अजून अकॕडमीतर्फे आयोजीत कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकांमधुन सौ.मनिषा पाटील,सौ.प्रतिभा केदार,सौ.कविता पाटील यांनी आप-आपल्या मनोगतातून अकॕडमीच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.प्रेमचंद चौधरी यांनी केले तर आभार प्रा.सतीश पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल देशपांडे,रवि पाटील,आर.के.पाटील आदि शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम