प्रताप महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाच्या १६ विद्यार्थांची बहुराष्ट्रीय आय.टी. कंपन्यांमध्ये निवड

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी ) प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सन २०२० -२१ व २०२१-२२ मधील बी.एस्सी./एम.एस्सी. च्या अंतिम वर्षातील १६ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय आय.टी. कंपन्यांमध्ये ऑफ कॅम्पस ड्राईव्ह द्वारे निवड झालेली आहे. सदर विद्यार्थांना उत्तम वार्षिक पगारासोबतच आकर्षक सुविधा देखील पुरविली जाणार आहे. तसेच विप्रो सोफ्टवेयर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीमार्फत पदव्युत्तर (एम.टेक ) शिक्षणासाठी देखील संधी उपलब्ध होणार आहे. प्रताप महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.निवड झालेल्या विद्यार्थांची नावे पुढीलप्रमाणे
वैष्णवी अनिल साळुंखे हिची विप्रो लिमिटेड या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून तर धनश्री चंद्रकांत शेंडे हिची टीसीएस या कंपनीमध्ये सीस्टम ऑंडमिनीस्टेटर म्हणून निवड झाली. तसेच कमलेश प्रकाश महाजन, संजना प्रशांत भंडारी ,वैशाली गोकुळ पाटील व करिष्मा भटू पाटील या विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये असिस्टंट सीस्टम इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली. रुपेश राजू ठाकूर, नेहा संजय न्हावी , रितेश जैन ,भावेश जलदेव महाजन, भूषण संजय सोनवणे यांची विप्रो लिमिटेड. मध्ये स्कॉलर ट्रेनी म्हणून निवड झाली आहे. अश्विनी नामदेव भदाणे या विद्यार्थिनीची टीसीएस या कंपनीमध्ये ग्रँजुएट ट्रेनी तर अनुष्का संजय ठाकरे हिची एमफासीस या कंपनीमध्ये ट्रेनी असोसियेट सौफ्टवेयर म्हणून निवड करण्यात आली. गौरव भानुदास पाटील व विशाल कैलास पाटील यांची कॅपजेमिनी मध्ये ग्रँजुएट ट्रेनी म्हणून निवड झाली आहे.मानसी संभाजी पाटील हिची इन्फोसिस या कंपनीमध्ये सीस्टम असोसियेट म्हणून निवड करण्यात आली.
सदर कॅम्पस ड्राईव्ह ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आला. या नियुक्तीबद्दल खा.शि. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, उपप्राचार्य डॉ. एम.एस.वाघ, उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ, उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. जे.बी .पटवर्धन , आयक्यूएसी(IQAC)चे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सदर कॅम्पस ड्राईव्हसाठी विविध स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.पुष्पा एम. पाटील, प्रा. नेहा एस.आगलावे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. टी.डी. चौधरी प्रा.ए.एन. शिंदे, ,प्रा.व्ही.एन.साळुंखे ,प्रा.बी.पी.सपकाळे , .एन.एस.बडगुजर,प्रा.एस.व्ही.पाटील ,प्रा. के.ए. बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम