कॉंग्रेसला इंडिया आघाडीची गरज नाही !
बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३
देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे तर पाच राजय्त विधानसभा निवडणूक देखील सुरु आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीची अजिबात काळजी नाही. आघाडीतील हा प्रमुख पक्ष पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतच व्यस्त आहे. त्यामुळे आघाडीचे कामकाज अड आहे, अशी घणाघाती टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. गुरुवारी भाकपच्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीच्या वाटचालीबाबत आता विधानसभा निवडणुकीनंतरच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बिहारच्या राजधानीत ‘भाजप हटवा देश वाचवा’ नावाने एक सभा आयोजित केली होती. जदयू प्रमुख नितीशकुमार यांना या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना नितीशकुमारांनी काँग्रेसवरही टीका केली. भाजपविरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या नावाखाली एकजूट झाले आहेत; परंतु खरे सांगायचे तर या आघाडीची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. काँग्रेसला आघाडीपेक्षा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अधिक स्वारस्य आहे. आघाडीतील सर्व घटक पक्षांनी काँग्रेसचे नेतृत्व मान्य केले हे. परंतु काँग्रेस आघाडीच्या वाटचालीबाबत निवडणुकीनंतरच सक्रिय होणार असल्याचे दिसते, असे नितीश म्हणाले. भाकप सरचिटणीस डी. राजा यावेळी उपस्थित होते. भाकप आणि जदयू दोघेही आघाडीचे घटक पक्ष आहे.
नितीशकुमार यांच्या पुढाकारानेच आघाडीची पहिली बैठक जून महिन्यात पाटण्यात झाली होती. नितीश यांनी यावेळी भाजपला लक्ष्य केले. भाजप आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्ष उभा करू पाहत आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भाजपचे कोणतेही योगदान नसल्याचे लपवण्यासाठी केंद्र सरकार देशाचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केला. माकप आणि भाकप या डाव्या पक्षांसोबत १९८० सालापासून आपले जवळचे संबंध आहेत. मला पहिली निवडणूक जिंकण्यात डाव्यांनीच मदत केली होती, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व डाव्या पक्षांना पुन्हा एकदा एकजूट होण्याचेदेखील आवाहन केले. भाजपविरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे सभा घेत आहेत; परंतु अद्याप त्यांची संयुक्त सभा झालेली नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम