बातमीदार | ८ ऑक्टोबर २०२३
देशभरातील सर्वच पक्षांनी लोकसभेची जय्यत तयारी सुरु असतांना राज्यात देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहे व यात कॉंग्रेस देखील जोरदार तयारी करीत आहे. गेल्या काही महिन्यांमधील महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलल्याने येत्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिल्लीत केला.
दरम्यान अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा एकच खासदार निवडून आलेला असताना या दाव्यामागे असलेल्या कारणांची माहिती देताना ते म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 20 आमदारही निवडून येणार नाही, असे दावे भाजपकडून केले जात होते. परंतु विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. महाविकास आघाडीतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आता पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील जनता या सर्व घडामोडी अगदी निरखून पाहत आहे. जातीयवादी भाजपशी लढणारा पक्ष म्हणून काँग्रेसची प्रतिमा तयार झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही पक्षाची स्थिती सुधारलेली दिसून येत आहे. यामुळे आता सात महिन्यांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला दिसणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम