ग्राहकांना होणार फायदा : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  जगभरातील अनेक लोकांना सोन्याचे दागिने खरेदी करून ते मिरवायची मोठी सवय असते. यात महिला खूप आघाडीवर असतात. कारण महिलांना सोने खरेदी करण्यामध्ये विशेष आनंद मिळत असतो. मात्र काही लोक सोने खरेदीकडे फक्त गुंतवणूक म्ह्णून पाहत असतात. त्यामुळे जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने व चांदी तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 69 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58531 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 69634 रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी संध्याकाळी 999 शुद्धतेचे (24 कॅरेट) शुद्ध सोने 58,644 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज (शुक्रवारी) सकाळी 58,531 रुपयांवर आले आहे. तसेच शुद्धतेच्या आधारे सोने स्वस्त झाले असून चांदी महाग झाली आहे.

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज म्हणजेच 7 जुलै रोजी सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,297 रुपयांवर आली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे (22 कॅरेट) सोने आज 53614 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याची किंमत 43898 पर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने (14 कॅरेट) आज 34241 रुपयांनी स्वस्त झाले असून 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 69634 रुपयांवर पोहोचले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम