बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | देशभरातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सलग दोन दिवसांनी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहक बिनधास्तपणे सोन्याची खरेदी करण्यासाठी जाऊ शकतात. रक्षाबंधन सणापासून सोन्याचे भाव बाजारात वाढले होते. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून हेच भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी ग्राहक सोन्याची खरेदी करू शकतात. कारण, शनिवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
Good Return वेबसाईटनुसार पाहिला गेले तर, शनिवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,850 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,840 रुपये एवढी सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 55,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,000 रुपये सुरू आहे. MCX वेबसाईटचे आजचे भाव काल प्रमाणे स्थिर आहेत.
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,850 रुपये
मुंबई – 54,850 रुपये
नागपूर – 54,850 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,840 रूपये
मुंबई – 59,840 रूपये
नागपूर – 59,840 रुपये
सोन्या सोबत आज चांदीचे भाव देखील घसरले आहेत. शनिवारी 10 ग्रॅम चांदी 735 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,350 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी ₹ 73,500 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांसाठी गोल्डन चान्स आहे ते एकाच दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करू शकतात. बऱ्याच दिवसांनी सोन्या-चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम