लग्नाआधी काजोल करायची ‘या’ व्यक्तीला डेट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | प्रत्येक अभिनेता व अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत येत असते. पण सध्या अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन आता त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. काजोल सोशल मीडियावर देखील अजय आणि कुटुंबावर असलेलं प्रेम व्यक्त करत असते. एवढंच नाही तर, कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी देखील अभिनेत्री चाहत्यांना सांगत असते. बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती. सध्या सर्वत्र काजोल आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. एवढंच नाही तर, लग्नाआधी अभिनेत्री अजय याच्याकडून डेटींग टिप्स घ्यायची. पण कार्तिक मेहता याच्यासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. काजोल हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम