क्रिकेटर राहुल अडकणार आज विवाह बंधनात !
दै. बातमीदार । २३ जानेवारी २०२३ । देशाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आज खंडाळ्यात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत विवाहबद्ध होत आहे. या लग्नात बॉलिवूड आणि देशातील बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांची जवळीक कोणापासूनही लपून राहू शकली नाही.
दोघांचेही फोटो एकाच लोकेशनवरून समोर येत होते, तसेच दोघेही व्हेकेशनमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. याआधी त्यांच्या प्रेमसंबंधांच्या फक्त अफवा होत्या, पण जेव्हा केएल राहुलने बीसीसीआयच्या कागदपत्रात जोडीदाराच्या ठिकाणी अथिया शेट्टीचे नाव लिहिले तेव्हा त्यांच्या नात्याची पुष्टी झाली. आज, त्यांच्या लग्नाच्या खास प्रसंगी, या जोडप्याच्या सुंदर प्रेमकहाणीवर एक नजर टाकू-
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर संवाद सुरू झाला आणि दोघांची मैत्री झाली. एकत्र वेळ घालवताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सिक्रेट रिलेशिनशिपमध्ये प्रवेश केला. दोघेही नेहमीच चर्चेत राहिले, पण असे असतानाही दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रिलेशनशिपमध्ये असूनही, दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो पोस्ट केले नाहीत.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्याच्या अफवा एप्रिल 2021 मध्ये वाढल्या जेव्हा अथियाने राहुलला दुसऱ्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 18 एप्रिल 2021 रोजी, राहुलसोबत एक सुंदर फोटो शेअर करत, अथियाने लिहिले – तू माझ्यासोबत असल्याने आभारी आहे. अथियाच्या या फोटोवर कमेंट करताना तिचे वडील सुनील शेट्टी यांनी लिहिले, बेशक। 3 जून 2021 रोजी, केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी साउथहॅम्प्टन, इंग्लंडला गेला, जिथे त्याचा सामना एगेस बाउल स्टेडियमवर होणार होता. केएल राहुलने इंग्लंडमधील अनेक छायाचित्रे शेअर केली, ज्याचे बॅकग्राउंड अथिया शेट्टीने शेअर केलेल्या फोटोसारखेच होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम